
वाळूजमहानगर, (ता.16) – सासरा घरी नसताना जावयाने घरात घुसून कपाटात ठेवलेले दोन लाख रुपये लंपास केले. ही घटना गुरूवारी (ता.14) रोजी वडगाव कोल्हाटी सलामपुरेनगर येथे सायंकाळी उघडकीस आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गजानन कटारे रा.वडगाव कोल्हाटी सलामपुरेनगर येथे पत्नीसह रहात असून तो मजुरी काम करतो. त्याची मुुलगी अंजली दाभाडे, जावाई सुनिल दाभाडे व त्याची मुलगी हे 1 वर्षीपासुन शेजारी राहतात. कटारेला चारचाकी वाहन खरेदी करण्याकरीता पैसे जमा करून घरात ठेवत होते. ही गोष्ट जावाई सुनिल दाभाडे यास माहिती होती. दरम्यान गुरूवारी (ता.14) रोजी
सकाळी 9 वाजेच्या सुमारास दाभाडे याचे सासरे कामासाठी घरातून बाहेर पडले होते. ते सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घरी आले असता त्यांची नात खाऊसाठी पैसे मागत होती. त्यावेळी कटारे यांनी पैसे नसल्याचे सांगितले. त्यावर माझ्या वडीलाकडे खुप मोठे पैसे असल्याचे नातीने आजोबाना सांगितले. त्यानंतर कटारे यांनी कपाट उघडुन पहीले असता, ठेवलेल्या ठिकाणी पैसे नव्हते. म्हणून ते मुलीच्या घरी गेले. मात्र त्यावेळी मुलगी व सावई घरी नसल्याने त्यांनी जावयास फोन करून घरी येण्यास सांगितले. मात्र जावाईने घरी येण्यास नकार दिला. त्यामुळे जावयानेच चोरी केल्याची सासऱ्याची खात्री झाल्याने वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
