March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.17) – चुकीचे उपचार केल्याने रुग्णाची प्रकृती बिघडली असा आरोप असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने रांजणगाव शेणपुंजी येथील साळुंखे पाटील हॉस्पिटलची पाहणी करून गुरुवारी (ता.16) रोजी झाडाझडती घेण्यात आली.

यावेळी आरोग्य विभागाच्या पथकाने हॉस्पिटलमध्ये असलेल्या सिस्टर, व कर्मचाऱ्यांचे कागदपत्राची पडताळणी केली. शिवाय हॉस्पिटलमध्ये असलेले औषधे, व सोयी सुविधाची पाहणी करण्यात आली. यावेळी गंगापूर तालुका आरोग्य अधिकारी आर के तुपे, सहाय्यक गट विकास अधिकारी ए एस भालेकर, औषधी निरीक्षक अंजली मिटकर, विस्तार अधिकारी एच.एल गोरे, आरोग्य सहाय्यक पंचायत समिती आर टी निकम, के एस झाटे, पोलीस अंमलदार किशोर घुसळे, किरण पैठणकर आदींची उपस्थिती होती.
काय आहे प्रकरण –
पोट दुखते म्हणून काही दिवसांपूर्वी संजय निमोने यांची मुलगी भारती सोनवणे या रांजणगाव येथील साळुंके हॉस्पिटल येथे उपचारासाठी गेल्या असता त्यांच्यावर चुकीचे उपचार झाल्यामुळे त्यांची तब्येत अचानक खालावली होती व त्यांना दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये तात्काळ हलवण्यात आले होते. भारती सोनवणे यांची प्रकृती गंभीर झाली असल्याने साळुंके हॉस्पिटलकडून चुकीचे उपचार झाले असल्याचा आरोप करत भारती यांचे वडील संजय निमोने यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
       चुकीचा आरोप केल्या जातो –
ढाळ, उलट्या होत्यात म्हणून पेशंट आले होते. त्यांना फक्त सलाईन लावले आणि इंजेक्शन सोडले. अवघ्या काही मिनिटातच पेशंटला फिट फिट आले. माझ्याकडे ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने मी त्यांना चांगल्या दवाखान्यात दाखल करण्याचा सल्ला दिला. सलाईन लावण्यापूर्वी मी जुन्या आजाराबाबत विचारणा केली. मात्र जुना आजार काहीच नाही असे त्यांनी सांगितले. चुकीचे उपचार केले, हा आरोप चुकीचा आहे. असे साळुंके हॉस्पिटलचे डॉ. विश्वासराव साळुंके म्हणाले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *