March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.4) – पक्ष्यांसाठी घोटभर पाणी, मूठभर चारा. या उपक्रमांतर्गत बजाजनगर येथील सामजिक विचार मंचाच्या वतीने परिसरातील विविध ठिकाणी पक्षांना पाणी पिण्यासाठी मातीच्या भांड्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हा उपक्रम मंगळवारी (ता.1) पासून सुरू करण्यात आला.

उन्हाचा कडाका लक्षात घेता सामाजिक विचार मंचातर्फे बजाजनगरातील विध्नहर्ता गणपती मंदिर, स्व के व्हि हिंगणकर नानी पार्क, स्व विकास पाटील संजिवन उद्यान तसेच विविध ठिकाणी घोटभर पाणी मुठभर चारा अभियानांतर्गत पक्षांना पाणी पिण्यासाठी पर्यावरण पूरक मातीच्या भांड्याची व्यवस्था करण्यात आली.
मंगळवारी (ता.1) पासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रम प्रसंगी अल्का शेवाळे, शालीनी ढोले, संगीता पाटील, आशा दबडे, सविता राऊत, पुजा पाटील, रजनी ठाकरे, सिमा कडु, वैशाली अवघडे, शोभा निकम, शितल हिंगणे, वनिता वडोदकर, केशव ढोले, दिलीप दबडे, निशांत ढोले, प्रकाश भगत, शिवाजी राऊत, ऋषीकेश पाटील, रवींद्र शेलगावकर, सुधाकर शेवाळे, रुपचंद अग्रवाल, राजेंद्र मोरे, सुरेश वंजारी, सुरेश शिंदे, अनिल सुपे,सावता अवघडे, पोपटराव थोरात, माणिक कुंभार, राजाभाऊ ठाकरे, मुरलीधर बाबर,वाल्मिक धोक्रट,राजु गोरगिले, अमर निकम, विनोद कराळे, मेनिनाथ खरबडे, बालाजी घटकार, वसंत कदम, विश्वंभर राठोड, श्रीराम पोटघंटे, संजय फलटणे, सदाशिव पाटील, रघुनाथ पेहलवान, चंद्रकांत तांबवे, अशोक बैनाडे, विनोद वडोदकर आदिंची उपस्थित होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *