March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.8) – ऑपरेटर म्हणून कंपनीत काम करतांना चोरी केलेल्या पाच लाख 60 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह आरोपीस एमआयडीसी वाळूज पोलीसांनी बुधवारी (ता.8) रोजी जेरबंद केले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील इटावा गट नंबर 13
मधील बोलजन अँड मदर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत फास्टनर, नट बोल्ट बनविण्यात येतात. त्यासाठी टॅब चा वापर होतो. या कंपनीच्या स्टोअर रूम मधून आरोपी वशिम तस्कीर अहमद रा. संग्रामपूर जिल्हा बदायू तालुका पिसोली बिलॉग आसमपुर याने 5 लाख 65 हजार रुपये किमतीचे 565 नग (टॅब ) 1 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान चोरी केले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पुढील तपास करतांना एमआयडीसी वाळूज पोलीसांनी आरोपी वशीम यास ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. आणि चोरी केलेले हे टॅब आरोपी वशिम याने बीड येथून कुरीअर व्दारे दिल्ली येथे पाठवले होते. त्यामुळे पोलीसांनी दिल्लीत येथे जाऊन टॅब खरेदी करणारा आरोपी पुनित जगदीशराम कौडल रा. लिबासपुर राज्य दिल्ली याच्या ताब्यातून 560 नग टॅब जप्त केले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरिक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. मनोद शिंदे, पोउपनि. प्रविण पाथरकर, पोह यशंवत गोबाडे, समाधान पाटील, हनुमान ठोके, सुरेश भिसे, नितीन इनामे, सुरेश कच, राजाभाऊ कोल्हे, बाळासाहेब आंधळे आदीनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *