
वाळूजमहानगर, (ता.22) – साजापूर येथील पोलीस कॉलनीत कुटुंबासह राहणारी 31 वर्षीय विवाहित महिला तिच्या दोन मुलींना घेऊन कोणास काही एक न सांगता घरातून निघून गेली. 27 फेब्रुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गेलेली ही महिला अद्यापही घरी न परतल्याने वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस कॉलनी साजापुर ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर येथील ज्योती विकास दाणे (31) ही खुशी वय 11 वर्ष व शिवन्या वय 9 वर्ष या दोन मुलीना सोबत घेवुन कोणास काही एक न सांगता 27 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घरातुन निघुन गेली. ती अद्यापही घरी परत आली नाही. त्यामुळे तिचा आजुबाजुच्या परिसरात नातेवाईकाकडे तसेच बसस्टैंड रेल्वेस्टेशन आदी ठिकाणी शोध घेतला. त्यांच्या मूळगावी फोन करुन विचारपुस केली. त्यांचा मोठेही पत्ता लागला नाही त्यामुळे. विकास राजू दाने यांच्या कबड्डीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश तारव करीत आहे.
तिचे वर्णन असे ,-
ज्योती विकास दाणे वय 31 वर्ष, रंग गोरा, उंची पाच फुट, चेहरा गोल, बांधा सडपातळ, केस काळे व लांब, अंगात हिरव्या रंगाचा ड्रेस, लाल रंगाची लेगीन पॅट, भाषा मराठी बोलते.
