
वाळूजमहानगर, (ता.9) – वाळुज औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यात उत्पादन करताना निघणारे वेस्टेज तसेच कॅन्टींगचा कुजलेले अन्न पदार्थ व केअर कचरा याची योग्य विल्हेवाट न लावता साजापूर येथील बाजार तळात अवैधररित्या उघड्यावरच टाकला जात आहे. त्यामुळे या बाजार तळाला उकिरड्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या कचरा टाकणाऱ्या वाहनांवर पाळत ठेवून दोन वाहने ग्रामपंचायत प्रशासनाने पकडून त्यांच्यावर दंड ठोकून बुधवारी (ता.8) रोजी कारवाई केली

वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील साजापूर बाजार तळावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या बाजार तळावर गट नंबर मधील तसेच वाळूज औद्योगिक वसाहतीमधील कंपनीतील वेस्टेज मटेरियल अवैधरित्या सर्रासपणे उघड्यावर टाकत आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरले आहे. या अवैधरित्या कचरा टाकणाऱ्या वर दंडात्मक कारवाई करण्याचे पाऊल ग्रामपंचायत प्रशासनाने उचलले आहे. बुधवारी (ता. 8) रोजी या कचरा टाकणाऱ्या वाहनांवर पाळत ठेवत बाजार तळावर दोन वाहने अवैधरित्या कंपनीचा कचरा टाकतानासाजापूर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. यावेळी ग्राम विकास अधिकारी श्रीकांत पाटील, सरपंच जनार्दन बनसोडे, उपसरपंच शेख कैसर, ग्रामपंचायत सदस्य शेख हबीब, हशम शेख, बबन गाडेकर, अविनाश बनसोडे यांनी संबंधित वाहनधारकांना टाकलेला कचरा गाड्यात भरण्यास भाग पाडले व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.
तर दंडात्मक कारवाई –
उघड्यावर कचरा टाकणाऱ्या वाहनावर तीन हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापुढे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई सुरूच राहील. दंड न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे कुठल्याही कंपनीने उघड्यावर कचरा टाकू नये. आवाहन राजापूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्रीकांत पाटील यांनी केले.
