February 5, 2026

वाळूज महानगर, (ता.29) – मराठा समाजास आरक्षणाच्या मागणीसाठी सिडको वाळूज महानगर -2 येथील साउथ सिटीत रविवारी (ता.29) रोजी काढण्यात आलेल्या कॅण्डल मार्चला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून त्यात महिलांची संख्या लक्ष वेधणारी होती. उद्यापासून या साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होणार आहे.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली येथे उपोषणास बसले आहे. त्यांच्या समर्थनार्थ शुक्रवारी (ता.27) रोजी पासून सकाळी साउथ सिटी येथील म्हाडा कॉलनी चौक सिडको वाळूज महानगर 2 येथे अतुल गुलाबराव दाभाडे यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. रविवारी (ता.29) रोजी रात्री 7.30 वाजता उपोषण स्थळापासून कॅन्डल मार्च काढण्यात आला. या कॅन्डल मार्चला परिसरातील मराठा समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात महिलांची संख्या लक्ष वेधणारी होती. शुक्रवारी (ता.27) रोजी पासून सुरू असलेल्या या उपोषणाचा आज तिसरा दिवस होता.

सोमवारी (ता.30) पासून या साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होणार असल्याची माहिती अतुल दाभाडे यांनी दिली. यावेळी विष्णू जाधव, दिनेश राऊत, ज्ञानेश्वर चौधरी, प्रदीप जामाले पाटील, कृष्ण बोबडे पाटील, बाळासाहेब केरे पाटील, संजय जगताप पाटील, डॉ शंकरराव घायवट दत्तात्रय वर्पे, जगदीश घुणे, अरविंद पावडे, एकनाथ पवार, बाबासाहेब घाडगे, सुमित शेजूळ, संतोष शहाणे, नागनाथ कोकणे यांच्यासह महिला व सकल मराठा समज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *