
वाळूज महानगर, (ता.7) – प्रसन्न शिक्षण संस्था संचलित पाटोदा येथील सह्याद्री स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा निर्मला म्हस्के, मुख्याध्यापक निलेश म्हस्के व श्रद्धा म्हस्के यांची उपस्थिती होती. 
यावेळी भगवान श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत विद्यार्थी शाळेत आले होते. शाळेच्या मैदानात साजरा करण्यात आलेल्या या उत्सवासाठी भगवान कृष्ण आणि दहीहंडी यांच्या प्रतिमांसह शाळेचे मैदान सुशोभित करण्यात येऊन दहीहंडी बांधण्यात आली. तीन थर रचून दहीहंडीसाठी प्री प्रायमरी गटातून गोपाळ कृष्ण बनून आलेला हर्षित कुमार, पहिली ते पाचवी च्या गटातून बाळकृष्ण बनून आलेल्या धर्मराज खांडेकर आणि सहावी ते दहावी गटातील श्रीकृष्ण बनून आलेल्या आदित्य आंबट याने दहीहंडी फोडली. जन्माष्टमीच्या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य केले. इयत्ता चौथी ते आठवी च्या विद्यार्थ्यांनी “कान्हा वाजवी बासरी” ही गवळण सादर केली. प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरती खंडागळे, रुचिका मेहेत्रे, जया पगारे, परमेश्वर तवार, सुप्रिया गणगे, आरती यादव, शितल महाले, ज्योती साळवे, मोनिका निर्मले, रत्नप्रभा पाटील, पूनम पाठक, शिल्पा पोफळी, प्रियंका गायकवाड, अभिषेक गौंड, देबारती घोष आदींनी परिश्रम घेतले.
