
वाळूज महानगर,(ता.1) – हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. आदर्श ग्राम पाटोदा येथील सह्याद्री स्कूल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा निर्मला म्हस्के यांच्या हस्ते ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांनी विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्यासाठी खेळाचे महत्व समजावून सांगितले. 
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांच्या माध्यमातून मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच युनिव्हर्सल स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय स्पर्धेत 14 वर्षाखालील संघ प्रथम क्रमांक मिळवून यशस्वी ठरला. विजेत्या संघास शाळेचे मुख्याध्यापक निलेश म्हस्के यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. 
यासाठी शिक्षिका रुचिका मेहेत्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुचिका मेहेत्रे, आरती खंडागळे, जया पगारे, सुप्रिया गणगे, आरती यादव, शितल महाले, ज्योती साळवे, मोनिका निर्मले, रत्नप्रभा पाटील, पूनम पाठक, शिल्पा पोफळी, प्रियंका गायकवाड, देबारती घोष, अभिषेक गौंड, कविता भराडे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
