March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.24) – मोफत साड्या आणि महिन्याला 4 हजार रुपये अशी सरकारी योजना मिळवून देण्याचे अमिष दाखवून 68 वर्षीय वृद्ध महिलेचे 2 हजार रुपये लुटून फरार होत असताना एका थापाड्या भामट्यास पोलिसांनी पकडून जेरबंद केले. हा प्रकार मंगळवारी (ता.23) रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथे घडला.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, परीगाबाई सुर्यभान रोडगे (68) रा. आर एम. 78 राधाकृष्ण सोसायटी, बजाजनगर ही वृद्ध महिला मंगळवारी (ता.23) रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाच्या रोड वरून घरी जात होती. ती एकटी असल्याचे पाहून दुचाकी (एम एच 20 जी एस- 1152) वरून जाणारा आरोपी शेख अक्रम शेख मोहम्मद (30) रा. सराई, अजिंठा ता.सिल्लोड (ह.मु.बीड बायपास) जि. छत्रपती संभाजीनगर हा तिच्या जवळ गेला व म्हणाला की, तिकडे चौकात साड्या वाटप चालु आहे, आणि सरकार म्हाताऱ्या लोकांना दर महिन्याला 4 हजार रुपये देत आहे. तुम्हालापण 4 हजार रुपये महीना चालु करुन देतो. त्यासाठी फॉर्म भरावा लागतो व फॉर्मसाठी 2 हजार रुपये फि आहे. तुम्ही माझ्याकडे 2 हजार रुपये द्या. असे म्हणाल्याने तिने पिशवीतुन 2 हजार रुपये काढुन दिले. त्याचवेळी गस्तीवरील पोलीस आले.

पोलिसांना पाहून आरोपी कावराबावरा झाल्याने पोलिसांना संशय आला आणि त्यांनी त्यास हटकले असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख अक्रम शेख मोहम्मद याच्या विरुद्ध भादंवि कलम 406, 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *