February 5, 2026


वाळूज महानगर, (ता.10) – बजाजनगर, वडगाव कोल्हाटीचे माजी सरपंच तथा समाजसेवक सचिन गरड यांच्या वाढदिवसानिमित्त भक्तिरसपूर्ण व भक्तिभावाने ओतप्रोत असे भव्य जाहीर कीर्तन रविवारी 11 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता बजाजनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.

या पवित्र कार्यक्रमाचे आयोजन कामगार आघाडीचे अध्यक्ष जितू दहातोंडे यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून भारतीय जनता पार्टीच्या संयोजनातून हा धार्मिक सोहळा होणार आहे. या मंगल प्रसंगी श्री क्षेत्र सरला बेट, गोदावरी धामचे मठाधिपती ह.भ.प. गुरुवर्य महंत धर्मरक्षक रामगिरी महाराज यांचे कीर्तन होणार असून त्यांच्या अमृतमयी वाणीतून हरिनाम, भक्ती, सदाचार व सामाजिक प्रबोधनाचा दिव्य संदेश समाजात पोहोचणार आहे. रामनामाच्या गजरात भक्तिभाव जागवणारे हे कीर्तन श्रोत्यांना आध्यात्मिक समाधान देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या भक्तिरसपूर्ण कीर्तन सोहळ्यास छत्रपती संभाजीनगरचे मंत्री अतुल सावे, माजी मंत्री भागवत कराड, आमदार संजय केनेकर, आमदार प्रशांत बंब, छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते तसेच महिला जिल्हा अध्यक्ष जय मालाताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. हा पावन कीर्तन सोहळा रविवारी 11 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता बजाजनगर येथील महादेव मंदिर, आम्रपाली जवळ आयोजित करण्यात आला आहे. या दिव्य व भक्तिमय कीर्तनाचा लाभ परिसरातील सर्व भक्तगण, बंधू-भगिनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा, असे आवाहन आयोजक व संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *