
वाळुज महानगर (ता.31) – सतगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या छत्रछायेखाली 78 वा वार्षिक निरंकारी संत समागम समालखा हरियाणा या ठिकाणी होत आहे. या संत समागमासाठी देश विदेशातून लाखोच्या संख्येने भक्तगण संमेलित होत असतात. याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातुन विशेष रेल्वे 29 ऑक्टोबर रोजी झाली होती.
माजी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून निरंकारी समागमासाठी विशेष ट्रेन नांदेड ते पानिपत सोडण्यात आली. या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी रेल्वे स्थानक प्रबंधक सुनिल बिरारे, आयपीएफएन भास्करराव साहेब, आशाताई पांडे, शेनफाडु नलावडे, नारायण भोंबे, सचिन आधाने, मनोज गायके, राहुल अदिक, शिवाजी वाघ, शिवाजी गिरणारे आणि इतर निरंकारी भक्तगण उपस्थिती होते.
