March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.26) – संत गुलाब बाबा यांच्या चरण पादुकांचा दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने सोमवारी (ता.24) रोजी सायंकाळी वाळुज महानगरात साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो भाविक या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.

पैठण येथील नाथषष्टी उत्सवानिमित्त श्री संत गुलाब बाबा समाधी मंदिर टाकरखेडा मोरे ता. अंजनगाव सुर्जी जि. अमरावती व श्री संत गुलाब बाबा आश्रम काटेलधाम ता. संग्रामपूर जि.बुलढाणा येथून दरवर्षी पैठण येथे संत गुलाब बाबांच्या चरण पादुका नाथांच्या दर्शनासाठी दरवर्षी आणण्यात येतात. त्यानंतर परतीच्या प्रवासात या चरण पादुका पैठण, अंबड, बोडखा, दावरवाडी, नक्षत्रवाडी येथील भक्तमंडळींनी आयोजित केलेल्या दर्शन सोहळ्यासाठी नेण्यात येतात. तेथून चरण पादुकांचे सिडको महानगर 1 येथील संत गुलाब बाबाचे निस्सीम भक्त मिलिंद खेर्डीकर व पलाश खेर्डीकर यांच्या निवासस्थानी सोमवारी (ता.24) रोजी आगमन झाले. तेव्हा पादुकांचे मोठ्या भक्तिभावाने पूजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन मंडळाचे आशिष महल्ले यांनी भजने सादर केली. चरण पादुका पूजन, आरती व महाप्रसाद आदी कार्यक्रम धार्मिक वातावरणात झाले. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची विविध पुस्तके भेट देण्यात आली.

 

या कार्यकम प्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे सदस्य विजय जैस्वाल, रोटरी क्लब संभाजीनगरचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या श्री गुरुदेव सेवा मंडळ मराठवाडा विभागाचे प्रांत सेवा अधिकारी मनीष जयस्वाल, राजाभाऊ देशमुख, श्री संत गुलाबबाबा संस्थानचे पदाधिकारी विठ्ठल टाकळकर, रमेश शिंदे, धनंजय कुलकर्णी, प्रकाश मिसाळ, विनोद देवकर, दामू वानखेडे, रमेश हिरे, शिवाजी चापोते, दीप वरोकार, उर्मिला टाकळकर आदिसह संत गुलाबबाबा भक्त परिवार व साई निवारा सोसायटी सिडको वाळूज महानगर- 1 येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *