
वाळूजमहानगर, (ता.30) – बजाजनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात शाकंभरी देवी नवरात्र उत्सवास शुक्रवारी (ता.30) पासुन प्रारंभ झाला. हा महोत्सव शुक्रवार ता.6 जानेवारी पर्यंत चालणार आहे.
शाकंभरी नवरात्र पौष महिन्यात येतात. शुक्ल अष्टमी ते पौर्णिमा या काळात हे नवरात्र साजरे करण्यात येतात. नवरात्रीची पूजन/सेवा विविध पद्धतीने करण्यात येते. या कालावधीत जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती पाठ वाचन करून देवीचे आशिर्वाद प्राप्त करावेत. असे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबेकेश्वर येथील पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी पत्रकाद्वारे सांगितले. केंद्रात त्रिकाल आरतीनंतर श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवा होईल. सर्व सेवेकऱ्यांनी स्वतःचा ग्रंथ सोबत आणावा. जास्तीत जास्त भाविकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा. असे आवाहन महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
