March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.22)- विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रेरणास्थान कै.गुलाबरावजी (दादा) राऊत यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम श्री.साईनाथ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या कोषाध्यक्षा प्रमिलाताई राऊत व प्रमुख अतिथी वाळूज ग्रामपंचायत उपसरपंच योगेश आरगडे, वाळूज व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र अभंग, माजी उपसरपंच तथा विद्यमान वाळूज ग्रा.पं. सदस्य सर्जेराव भोंड, कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूरचे उपसभापती व वाळूज ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे, बबनराव गायकवाड, डॉ.एम.डी.संकपाळ, लोकविकास बँकेचे संचालक अविनाश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व दादांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु.शुभांगी व्यवहारे, कु.ज्योती खैरनार, कु.श्रावणी त्रिभुवन यांनी सुमधुर भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम सादर केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धातील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. अध्यक्षांच्या वतीने अशोक कमोदकर यांनी अध्यक्षीय विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य व्ही.एस. बेडसे यांनी केले. सुत्रसंचलन संज्योती रोठे यांनी तर डी.एम. खेळवणे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *