February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.28) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथे श्री संप्रदायच्या वतीने 22 जानेवारी रोजी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या हळदी कुंकू कार्यक्रमात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज प्रबोधनकार निर्मलाताई खंडागळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच तालुका अध्यक्ष घावटे, रेखाताई पवार, रांजणगाव (शेणपुंजी) संतसंग सेवा केंद्र अध्यक्ष संदिपभाऊ निळ यांचेही मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमाला परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रांजणगाव (शेणपुंजी) तसेच घाणेगाव, नरसापुर, सारंगपूर, आंबेगाव वाडी, जामगाव, गंगापूर, भेंडाळा, वाहेगाव, तुर्काबाद (खराडी) येथेही हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. या सर्व केंद्राला तालुका सेवा समिती यांचे मार्गदर्शन लाभले.

                भेंडाळा सेवा केंद्र

अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व परम पूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने स्व स्वरूप संप्रदाय, गंगापुर तालुका सेवा समती यांच्या वतीने भेंडाळा सेवा केंद्र येथे महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम शनिवारी (ता.27) रोजी
घेण्यात आला होता.

यावेळी नानिज संस्थांच्या ज न म प्रवचन कार मंदाताई सुस्ते व गंगापूर तालुका महिला अध्यक्षा रेखाताई पवार यांनी मार्गदर्शन केले. या हळदी कुंकाला गंगापूर तालुका सेवा समिती उपस्थित होते.

          क्रिकेट स्पर्धाचेही आयोजन
“परमवंदनीय जगद्गुरुश्रींच्या व पिठाचे उत्तराधिकारी परमपूज्य दादाश्रीं” यांच्या कृपाशीर्वादाने स्व स्वरुप संप्रदाय गंगापूर तालुक्यातील एकूण 21 सेवा केंद्रच्या वतीने 22 जानेवारी रोजी क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. या क्रिकेट स्पर्धा रांजणगाव (शेणपुंजी), घाणेगाव, आंबेगाव वाडी, खादगाव, लांझी या सेवा केंद्र अंतर्गत झाल्या. या क्रिकेट स्पर्धासाठी गंगापुर तालुका युवा प्रमुख सुनील गवळी यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *