
वाळूजमहानगर, (ता.2) – श्री शिवाजी विद्यालय रांजणगाव (शे.पुं.) शाळेत महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे होते. तर प्रमुख पाहुणे उद्योजक अण्णासाहेब कुंभारे हे होते. कार्यक्रमासाठी शालेय समिती सदस्य केशव पाटील नंदनवनकर व सोमीनाथ हिवाळे, पर्यवेक्षिका सुरोज पवार, विजयसिंह परदेशी उपस्थित होते. उद्दोजक अण्णासाहेब कुंभारे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. शाळेच्या वतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या कामगाराचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल भांड यांनी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे महत्त्व सांगून अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन वैशाली सपकाळ यांनी केले तर आभार शिवकुमार होनराव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश सुलताने, बी.जे.पाटील, भगवान वनारसे, संतोष बंडेवार, सुरेश घोरबांड, गणेश गिरी, प्रल्हाद राठोड, मारोती राठोड, काळेश्वर भुरे, मनोज सुरनर, रमा आडे, सविता गोसावी, आशा साळुंके, सतीश जावळे यांनी सहकार्य केले.
