
वाळूज महानगर, (ता.23) – वाळूज परिसरातील श्री शिवाजी विद्यालय रांजणगाव (शेणपुंजी) या शाळेत दहावी बोर्ड परीक्षेतील गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. 
शैक्षणिक वर्ष 2022-23 एसएससी बोर्ड चा निकाल 86.84 टक्के लागला. या परिक्षेत 38 विद्यार्थी बसले होते. त्यातील 33 विद्यार्थी पास झाले. या परीक्षेत गुणाानुक्रमे प्रथम अधाने महेश 92 टक्के, द्वितीय बिर्गड पल्लवी 87.20 टक्के, तृतीय वाघमारे मीनाक्षी 85.20 टक्के व चतुर्थ आढाव महेश 84.80 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, सचिव गुरुनाथराव कुरडे, संस्थेचे सहसचिव ऍड मुक्तेश्वरराव धोंडगे, पालक व या विद्यार्थ्यांना शिकवणारे, मार्गदर्शन करणारे शिक्षक, केंद्र केंद्र संचालिका सरोज पवार तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा.रवींद्र साहेबराव खरात, शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे, शालेय समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वागत केले.
