March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.21) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर व बसवंतराव पाटील प्राथमिक व माध्यमिक इंग्लिश स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन प्राणायाम, ज्ञानसाधना व मार्गदर्शनाने बुधवारी (ता.21) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव होते.

यावेळी परिसरातील स्थानिक रहिवासी योगगुरू मधवानंद सोनवणे बाबा यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट योग, व्यायाम, प्राणायाम शिकविले तसेच परम पूज्य निर्मला माताजी प्रणित सहज योग परिवारातील देशमुख यांनी विद्यार्थ्यांना ध्यान साधना केल्याने स्मरणशक्तीत सुधारणा होऊन अभ्यासात प्रगती होते. साधनेमुळे होणारे फायदे सांगितले. तसेच शारीरिक रोग मानसिक ताण-तणाव यासारखे अनेक आजार बरे होण्यास मदत होत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, संस्थेचे सचिव हरीश जाधव, माध्यमिकचे मुख्याध्यापक एम. व्ही. शिनगारे, बी. व्ही. शिरसाट, प्राथमिकच्या रेखा बिदरकर, शहाजी मंगनाळे संभाजी जाधव, हनुमान जाधव, निलेश मिसाळ, प्रीती नरवडे, दीप्ती झाडे, सोनी शुक्ला, लता वैष्णव, पूजा खोतकर, पूजा ठाकूर, ममता खोतकर, हर्षदा भुमे, हनुमान जाधव, विजया पवार यांची उपस्थिती होती. रेखा बिदरकर यांनी नियोजन केलेल्या या कार्यक्रमाचे आभार संभाजी जाधव यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *