
वाळूजमहानगर, (ता.3) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर, श्री गजानन ज्युनिअर कॉलेज, बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल यांच्या सयुक्तविद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून शाळेत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आय.जी. जाधव होते.
प्रथम प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येऊन प्रमुख पाहुणे रांजणगाव (शे.पू.) चे तलाठी विनोद माळी, सचिव हरिष जाधव, मष्णाजी शिनगारे, शहाजी मंगनाळे, मनीषा नवथर, भाऊसाहेब शिरसाठ, रेखा बिदरकर, यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच शाळेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन पालकासमवेत सत्कार करण्यात आला. त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा 2024 साठी शाळेतील पात्र ठरलेल्या 9 विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनीषा नवथर व आभार मष्णाजी शिनगारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक तारडे, परमेश्वर गीते, सौरभ लगड, सुनील शिंदे, उल्हास वाघ, संभाजी जाधव, अश्विनी सूर्यवंशी, स्वाती सूर्यवंशी, उज्वला सवई, गंगासागर बोराडे, संजीवनी चिकाळे, गुलाब मोहिते, छाया वाघदरे, निकिता देशमुख आदीनी परिश्रम घेतले.
