
वाळूज महानगर, (ता.22) – केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयातर्फे घेतलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने चिऊ काऊ बाल संस्कार मंडळ संचलित श्री गजानन प्राथमिक विद्यामंदिर रांजणगाव (शे.पु.) या शाळेचा विद्यार्थी प्रशांत बापू वाघमारे त्याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.
प्रशांत वाघमारे या विद्यार्थ्याने शैक्षणिक वर्ष 22-23 मध्ये 5 वीत असताना जवाहर नवोदयची परीक्षा दिली होती. उत्तीर्ण झाल्याने तो 6 वी साठी नवोदय विद्यालयात प्रवेशपात्र झाला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत व शिक्षणाची जिद्द या विद्यार्थ्याने उराशी बाळगली होती. या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष आय.जी.जाधव, सचिव हरीश जाधव, प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक मुख्याध्यापक मष्णाजी शिनगारे यांनी प्रशांतचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. तसेच सहशिक्षक अशोक तारडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक शहाजी मंगनाळे, कल्याण कुलकर्णी, विशाल जाधव, संदीप हिंगणकर, परमेश्वर गीते, हनुमंत जाधव, गुलाब मोहिते, अश्विनी सूर्यवंशी, स्वाती सूर्यवंशी, मनीषा नवथर, उज्वला सवाई, गंगासागर बोराडे, उल्हास वाघ, सौरभ लगड, सुनील शिंदे, प्रल्हाद मंगनाळे आदींची उपस्थिती होती.
