
वाळूजमहानगर, (ता.22) – श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये पोस्टर सादरीकरण व मॉडल मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सहाय्यक सचिव पी.एस. सोलंकी, डी.आर.दंडगवाळ, भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सहसचिव अमन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. अभिजीत पोहेकर, अभय जोशी, प्रकाश म्हस्के व शीतल चव्हाण यांनी पोस्टर सादरीकरण व मॉडल मेकिंग मूल्यांकन करून विजेते घोषित केले. या स्पर्धेकरिता 140 विद्यार्थ्याने नाव नोंदवून मोठ्या प्रमाणात स्पर्धेकरिता उत्साह दाखविला. स्पर्धेकरिता भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, सहसचिव अमन जाधव, प्रशासकीय अधिकारी भागचंद जाधव तसेच भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थे अंतर्गत श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष शेळके, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने कार्यक्रम यशस्वी झाला.
