
वाळूजमहानगर, ता.4 (बातमीदार) – बजाजनगर येथील श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी येथे स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची जयंती शुक्रवारी (ता.3) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथम भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव व हर्षला जाधव, सहसचिव अमन जाधव यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले. कार्यक्रर्मात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शेळके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवन भाषणे केली. कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी भागचंद जाधव यांच्यासह शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते.
