वाळूजमहानगर, (ता.5) – राहते घरी विद्युत मोटारीच्या वायरचा शॉक लागल्याने एका 45 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना रांजणगाव (शेणपुंजी) येथे शनिवारी (ता.4) रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रांजनगाव (शेणपुंजी) येथे संतोष सुधाकर कोतवाल वय 45 वर्ष, याला पाण्याच्या ईलेक्ट्रीक मोटारीच्या वायरचा शॉक लागला. शनिवारी (ता.4) रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास रहाते घरी घडलेल्या या घटनेत संतोष कोतवाल हा बेशुद्ध झाल्याने त्याला अक्षय अहुडे यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासुन रात्री 8:15 वाजेच्या सुमारास मयत घोषित केले. या प्रकरणी पोलीस हवालदार एम.डी. सोनवणे यांच्या खबरीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात कृतीची नोंद करण्यात आली आहे तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश तारो करीत आहे.
