March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.2) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील न्यू शहीद भगतसिंह विद्यालयात सोमवारी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणासह शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचा गुण गौरव व प्रगती पुस्तक वाटप आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा तथा शाळेच्या मुख्याध्यापिका भारतीय साळुंके होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी मुख्याध्यापक इस्माईल शेख, प्राचार्या सोनवणे, संस्थेचे पदाधिकारी अक्षय हरकळ यांची उपस्थिती होती. प्रथम मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रतिमा पूजन करण्यात आले व तदनंतर इयत्ता पहिली ते नववी व अकरावी विद्यार्थ्यांना प्रगती पुस्तक वाटप करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेला विद्यार्थी सचिन आव्हाड या विद्यार्थ्याचा पालकांसहित शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कर्ष आहेर यांनी तर आभार प्रदर्शन आत्माराम देवरे यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *