February 5, 2026


वाळुजमहानगर – किरकोळ कारणावरून दोघा भावाना तीघांनी शिवीगाळ करून लोखंडी गज मारून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरूवारी 27 नोव्हेंबर रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास बजाजनगरात घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सिडको वाळूज महानगर -1 येथील आंनद पगडे हा एका भोजनालयात वेटर म्हणून काम करतो. तो गुरूवारी 27 नोव्हेंबर रोजी सकाळी नेहमी प्रमाणे कामावर गेला होता. सायंकाळी 10:30 वाजेच्या सुमारास आनंद व त्यांचा भाऊ शुभम हे दोघे स्कुटी (एमएच 20, जी डब्लु – 5284) वरून घरी जात असताना त्यांना शिवराणा चौकात एका दारुड्याने व त्याच्या अन्य दोन साक्षीदारांनी तु आमच्या घरासमोर का थांबला.असे म्हणून वाद घालण्यास सुरवात केली. त्यावेळी दोघे भाऊ त्याला समाजविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांचे त्याने काहीही न ऐकून घेता आंदन व शुभमला शिवागाळ करून आनंद याला लोखंडी गजाने डोक्यात मारून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी देत निघून गेले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *