March 23, 2026

वाळूजमहानगर, ता.9 (बातमीदार) – शहीद भगतसिंह हायस्कूल बजाजनगर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गौतम शिंदे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख रामा चोपडे व रोहिणी पवार उपस्थित होते.
प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी मुख्याध्यापक गौतम शिंदे, रामा चोपडे व रोहिणी पवार यांनी मार्गदर्शन केले. तर क्रांती अंबुलगेकर व प्रांजली मोरे यांनी गीत सादर केले. कार्यक्रमास वर्षा जाधव, महादेव लाखे, भरत बोडके, शहाजी भुकन, जितेंद्र बरंजाळेकर, सुनीता साक्रूडकर, सुनंदा गायकवाड, सोनल पाटील, हरिश्चंद्र गवळी, आतिष डोईफोडे, अंबिका साळवे, ज्योती बाणेदार, आशिष मात्रे, सुनील बर्डे, प्रकाश वाघ, विनोद म्हस्के, भाऊसाहेब कोळी, शैलेंद्र रसाळ आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. हरिश्चंद्र गवळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *