March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.9) – शहीद भगतसिंह हायस्कूल बजाजनगर येथे शहीद भगतसिंह दिनदर्शिकेचे प्रकाशन शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष लक्ष्मण साक्रूडकर हे होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ उद्योजक आशिष कटारिया, शहीद भगतसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक गौतम शिंदे, शहीद भगतसिंह प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नितीन देशमुख उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते शहीद भगतसिंह दिनदर्शिका 2023 चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जेष्ठ उद्योजक आशिष कटारिया मार्गदर्शन करताना म्हणाले की, समाजाप्रती प्रत्येकाचे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दायित्व असे केले पाहिजे तर कर्तुत्व दृष्टी येते. त्यातून नेतृत्व क्षमता वर्धित होत असते. हा शहीद भगतसिंह यांच्या जीवन संघर्षाचा वास्तववादी आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून तो अंगीकारावा तसेच विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम करून आपले भविष्य उज्ज्वल करावे. याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष लक्ष्मण साक्रूडकर, मुख्याध्यापक नितीन देशमुख, मुख्याध्यापक गौतम शिंदे यांनीही समयोचित भाषण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्षा जाधव, रामा चोपडे, महादेव लाखे, रोहिणी पवार, चक्रधर डाके, शितल घोडके, राजेंद्र मघाडे, भरत बोडके, शहाजी भुकन, जितेंद्र बरंजाळेकर, सुनीता साक्रूडकर, सुनंदा गायकवाड, सोनल पाटील, हरिश्चंद्र गवळी, आतिष डोईफोडे, अंबिका साळवे, ज्योती बाणेदार, आशिष मात्रे, सुनील बर्डे, प्रकाश वाघ, विनोद म्हस्के, भाऊसाहेब कोळी, शैलेंद्र रसाळ आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी रामा चोपडे यांनी तर आभार हरिश्चंद्र गवळी यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *