March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.19) – शहीद भगतसिंह विद्यालयात, बजाजनगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक गौतम शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नितिन देशमुख, शिक्षक प्रतिनिधी रामा चोपडे हे उपस्थित होते. प्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मानाचा मुजरा करण्यात आला.

या प्रसंगी शिंदे यांनी अध्यक्षीय भाषण केले. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज फक्त व्यक्तिमत्व नाही तर मातीत स्वाभिमान, पराक्रम, दूरदृष्टी, चातुर्य, संस्कार, सृजनशीलता पेरणारा विचार आहे. आयुष्यातल्या कुठल्याही संकटावर मात करण्यासाठी लागणारी ऊर्जा, जगण्याची उमेद म्हणजे शिवराय प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करण्यासाठी सर्वोच्च ऊर्जा स्त्रोत म्हणजे शिवराय असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे व शहीद भगतसिंह प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नितीन देशमुख यांनी केले. तसेच प्रमुख पाहुणे रामा चोपडे यांनी समायोजित अशी भाषणे केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मघाडे तर आभार वैभव ढेपे यांनी मानले. या प्रसंगी शाळेतील वर्षा जाधव, महादेव लाखे, वैभव ढेपे, रोहिणी पवार, चक्रधर डाके, राजेंद्र मघाडे, शितल घोडके, भरत बोडखे, शहाजी भुकन, जितेंद्र बरंजाळेकर, सोनल पाटील, सुनीता साक्रूडकर, वर्षा पाटील, वर्षा बनकर, पुनम सुर्वे, रुपाली नवले, अश्विनी सुरडकर, गीता काकडे, वैशाली पाटील, अर्चना शेंडे, अर्चना समरीन, राजश्री घुले, प्रकाश वाघ, भाऊसाहेब कोळी आदी शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *