February 5, 2026

वाळुज महानगर – गरवारे मैदानावर सुरू असलेल्या 17 व्या व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत किड्स किंग्डमने चाटे स्कूलचा 3 गडी राखून तर गायकवाड ग्लोबल हायस्कूलने द वर्ल्ड स्कूलला 24 धावांनी पराभूत केले. पहिल्या सामन्यात चाटे स्कूलचा डाव निर्धारीत 20 षटकांत 113 धावांवर संपुष्टात आला.


यात आदित्य बागुलने 10 चौकारांसह 58, अनिष शेणॉयने 11, प्रतिक कदमने 10 धावा केल्या. किड्स किंग्डमतर्फे नवीन गायकवाडने 4, सामनावीर साहिबसिंग ग्रंथीने 3, आयुष रोकडे, तन्मय घुमने, चोरडिया यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरात किड्स किंग्डम संघाने विजयी लक्ष्य 19 षटकांत 7 खड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यात तेजस पुर्जने 29, केतन पारेख व आयुष रोकडे यांनी प्रत्येकी 19 धावा केल्या. चाटे स्कूलतर्फे ओंकार गोलेने 3, आदित्य जोशी, अवनिश देसाई, शुभमकर काळे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात गायकवाड ग्लोबल संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 120 धावा केल्या. यात वरद पिवळे 35, देवेंद्रने 26, अथर्व मोकाशीने 14 धावा केल्या. द वर्ल्ड स्कूलतर्फे प्रणव गंगावणे याने 2, तनिष्क मालानी, अनुज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरात द वर्ल्ड स्कूलचा डाव 18 षटकांत 96 धावांवर संपुष्टात आला. यात कृतार्थ पातळ 25, अभय ठाकरे 17 हेच दुहेरी आकडा गाठू शकले. गायकवाड ग्लोबल हायस्कूलतर्फे सामनावीर अथर्व मोकाशीने 2, सोहम गायकवाड, आकाश तरडे, वरद पिवळ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *