March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.2) – सिडको वाळूज महानगर -1, तिसगाव परिसरातील व्हीआयटी इंग्लीश स्कूलच्या मुख्यध्यापिका योगिता बनकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तसेच इंडियन टॅलेंट ऑलिम्पिडच्या वतीने बेस्ट प्रिन्सिपॉल अवॉर्ड देण्यात आला.

 

हा बेस्ट प्रिन्सिपॉल अवॉर्ड भारतातील पहिली महिला आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी व पद्मभूषण अवॉर्ड विजेत्या साईना नेहवाल यांच्या हस्ते मुंबई येथे मिळाल्यामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कुलकर्णी व सचिव सिद्राम पारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी योगिता डबीर, उषा माळी यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *