
वाळूजमहानगर, (ता.5) – दहावी पास झाल्यानंतर वीस वर्षापासून दूरावलेले वर्गमित्र पुन्हा एकत्र आल्याने एकमेकांना पाहून त्यांना गहीवरून आले. एकमेकांची खुशाली विचारत त्यांनी मोठ्या आनंदाने आलिंगन दिले. या जुन्या मित्रांचा गगनात न मावणारा आनंद नेहरू विद्यालय सावखेडा ता गंगापूर येथे रविवारी (ता.5) रोजी पहावयास मिळाला. निमित्त होते गेट-टुगेदर चे.
सावखेडा येथील नेहरू विद्यालयात माजी विद्यार्थ्यांना
( 2003-04 इ दहावीची बॅच) वर्ग मित्राचा मेळावा (ता.5) रोजी रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी
शाळेतील आजी, माजी मुख्याध्यापक, शिक्षक, पर्यवेक्षक, ग्रंथपाल विशेषतः शिपाई आवर्जुन उपस्थित होते. या मेळाव्यात शाळेतील फक्त शिक्षकच गुरू नसुन शाळेत शैक्षणिक कार्यात अप्रत्यक्षपणे काम करणारा कर्मचारी सुध्दा गुरूस्थानी असतो. ही मोठ्या मनाची भावना त्यातुन दिसुन आली.
या मेळाव्यासाठी शाळेच्या प्रांगणात भव्यदिव्य मंडप टाकून फुग्यांची सजावट केली. बसायला खुर्च्या, शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थींनीना फेटे बांधुन सर्वांचे आदरपुर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी वीस वर्षा पूर्वी बाहेर पडलेली बॅच एकत्र दिसल्याने सर्वांना आनंद वाटला. आपल्या आई वडिलांच्या गुरूजणांच्या आशिर्वादाने आपण प्रगतीच्या वाटेने कुठं पर्यंत पोहोचला हे प्रत्येक जण सांगत होता. लेकरा बाळात रमलेली पोरं आपल्या वर्ग मित्रासाठी आवर्जून आली होती. दहावी बारावी नंतर शाळा सोडून गेलेली मुल बाहेर भेटली की सर म्हणुन ख्याली खुशाली विचारतात. मग मनात प्रश्न निर्माण होतो कोण हा? गावातील सतत संपर्कात असणारे ओळखले जातात. परंतु वीस वर्षानंतर एकत्र आलेले वर्गमित्र फारसे ओळखत नव्हते.
कार्यक्रम सुरु झाला, मुलांनी मनोगत व्यक्त करायला सुरूवात केली आणि माझ्या मनाचा कॅमेरा मागे फिरला. ही मुलं काहीशी आठवू लागली. अगदी दिसायला छान हुशार टापटीप सायकलवर येणारा अनिल गावंडे दिसला. ग्रंथालयात यायचा ईतरवाचनाचे पुस्तक वाचायचा. तो आज चांगल्या ठिकाणी नोकरी करतो. त्याच बरोबर इंजिनिअर मारोती बोरूडे पण भेटला. काॅट्रंक्टर कृष्णा बोबडे, व्यावसायिक सुनिल शेंगुळे, गुड्डू वल्ले, फकीरचंद ठोकळ, शाईनाथ ठोकळ, संभाजी बुट्टे, मुली मधुन आशा, स्वाती, सुनीता, कावेरी, रंजना ही व यांच्या सारखे अनेक मुले, मुली नुसते मोठेच झाले नाही तर ते विचाराने मोठी झाली. हे त्यांच्या भाषणातुन कळाले. त्या वेळी रांगडा वाटणारा दिपक शिलेदार रांगडाच आहे. प्रगतशील शेतकरी म्हणुन प्रसिद्ध आहे. भाषण सुध्दा छान केले. सहज वर्ग मित्राना दारू न पिण्याचे सांगुन गेला हे विचार या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतले पाहिजे. विठ्ठल मुळे, सुर्यवंशी, तांगडे, ज्ञानेश्वर गांवडे ही सर्व मुले आपापल्या क्षेत्रात सरस आहे. असे वाटले. फकीरचंद ठोकळ, शाईनाथ ठोकळ, पठाण, शेख, सुनिल, रावसाहेब सुकासे यांनी त्यांच्या परीने शून्यातून विश्व निर्माण केले. अनिलच्या भाषणातुन संभाजी बुट्टे याचे नाव सतत आले. संभाजी सुध्दा गावचा ग्रामपंचायतचा सदस्य आहे. सावखेडा गावात बुट्टे आण्णाचा गुळाच्या चहा हाॅटेल प्रसिद्ध आहे. या बॅच सोबत आजचा दिवस घालवला खुप छान वाटले.
मुलीही भाषणात आदर्श गृहीणी आहे असं अभिमानाने सांगत होत्या. म्हणजे कोणतंच काम हलकं नाही. ही विचाराची देवान घेवाण निश्चित आपल्या आयुष्यात अजून पुढे जाण्यास कामी येईल. त्यांचा सावखेडा ग्रामपंचायत सदस्य वर्ग मित्र शाईनाथ ठोकळ याने नृसिंह केटरिंगच्या माध्यमातून सुंदर सुरस लज्जत दार जेवन सर्व मित्रांच्या सहकार्याने दिले. आज त्यातील प्रत्येकजन शैक्षणिक औद्योगिक, शेती, व्यावसायिक, धार्मिक या सर्व क्षेत्रात अग्रेसर दिसला. या पुढेही त्यांची प्रत्येकाची प्रगती होत राहो व मनातील ईच्छा पुर्ण होवो. अनिल गावंडे, मारोती बोरूडे, सुनिल शेंगुळे, शाईनाथ ठोकळ, फकीरचंद ठोकळ, दिपक शिलेदार, विठ्ठल मुळे यांच्या पुढाकारातुन वर्ग मित्रांचा हा कार्यक्रम अप्रतिम झाला. त्यास उपस्थित राहण्याचे व या कार्यक्रमाचे क्षण मनाच्या कोपर्यात जतन करून ठेवण्याचे भाग्य आम्हाला लाभले. 2003-04च्या बॅचचे या वर्ग मित्रांना सोबत राहण्याचे भाग्य अखंड मिळत राहो.
शब्दाकंन:
बि एन मुळे ग्रंथपाल
नेहरू विद्यालय सावखेडा
