March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.9) – पाणी आणण्यासाठी जात असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी 8 सप्टेंबर रोजी गुरु धानोरा येथे घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरु धानोरा येथे स्वतःच्या विहिरीमध्ये पाणी आणण्यासाठी जात असताना नवनाथ किसन भावले (वय 65 वर्ष) रा. गुरु धानोरा ता. गंगापूर यांचा पाय घसरून ते विहिरीमध्ये पडले. ही माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे, अनिकेत मुळक, शिवा ठुबे तसेच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी नाणिजधाम यांच्या विनामूल्य ॲम्बुलन्सचे पायलट संदीप त्रिंबके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन नवनाथ भावले यांना विहिरीतून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय गंगापूर घाटी येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *