March 23, 2026

वाळूजमहानगर, ता.26 – रस्त्याने जात असताना तिसगाव येथे 23 वर्षीय विवाहितेने काहीतरी विषारी औषध केल्याने ती अत्यवस्थ झाली. तिच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
नेहा प्रशांत शिंदे (वय 23), रा. प्लाट नं.6 एन -8 गायत्री सोसायटी छत्रपती संभाजीनगर ही करोडीला जात असतांना तिसगांव फाटा येथे तिने काहीतरी विषारी ओषध सेवन केले. मंगळवारी (ता.26) रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत अत्यवस्थ झाली. प्रशांत उमराव शिंदे रा. गायत्री सोसायटी यांनी तिला उपचारार्थ खाजगी दवाखान्यात दाखल केले. तीच्यावर पुढील उपचार चालु आहेत. याप्रकरणी दवाखान्यातून आलेल्या माहितीवरून वाळून एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *