February 5, 2026

वाळूज महानगर – जोगेश्वरी ते कमळापूर रस्त्यावर असलेल्या वसाहतीतील दत्त मंदिरात पूजा, महाआरती तसेच महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करून गुरुवारी 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या मंदिराबाबत सांगितल्या जाणारी अख्यायिका अशी की, वाळुज येथील न्हावी समाजाचे विठ्ठल गणपत राऊत महाराज हे वयाच्या पंधराव्या वर्षापासून जोगेश्वरी- कमळापूर येथे नेहमी ये जा (अपडाऊन) करत होते. आज त्यांचे वय 102 वर्षाचे आहे. जोगेश्वरी ते कमळापूर दरम्यान एक ओढा वाहतो. या रस्त्यावरून जाताना राऊत महाराज हे ओढ्या काठी बसत असे. तेथेच सोबतआणलेली शिदोरी खाऊन ओढ्यातील पाणी पीत असे. हा त्यांचा दररोजचा नित्यनियम होता.

……..

https://youtube.com/watch?v=zNY2pOSaDMY&feature=shared RK NEWS LIVE का app आ गया है । सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य Community कार्ड प्राप्त करे – Powered by Kutumb App

https://primetrace.com/group/821231/post/1173422600?utm_source=android_post_share_web&referral_code=H2MZ8&utm_screen=post_share&utm_referrer_state=SUPER_ADMIN

 

एक दिवस ते ओढ्याकाठी बसलेले असताना त्यांना दत्ताचा साक्षात्कार झाला. सोबतची शिदोरी खाऊन ते ओढ्यावर पाणी पीत असताना त्यांना पाण्यात दत्ताची दगडी मूर्ती दिसली. ही मूर्ती राऊत महाराजांनी मोठ्या भक्तीभावाने उचलून ओढ्याकाठी स्थापन केली. गावकऱ्यांच्या मदतीने तेथे छोटेसे मंदिर बांधले. आणि तेव्हापासून आजतागायत राऊत महाराज हे दत्ताची सेवा करतात. या मंदिरात जवळजवळ 80 वर्षापासून अखंडपणे दत्त जयंती साजरी करण्यात येते.

दिवसेंदिवस येथील मंदिरात दत्त जयंती निमित्त गर्दी वाढत आहे. गुरुवारी 4 डिसेंबर रोजी झालेल्या दत्त जयंती निमित्त मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. बारा वर्षानंतर गुरुवारी दत्त जयंती आल्याने दत्ताच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे परिसरात पान फुल, नारळ, संसार उपयोगी वस्तूंच्या दुकाना, खेळणी, रेडीमेड कपडे, मिठाई अशा विविध दुकाना थाटल्या होत्या. त्यामुळे या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. सकाळी दत्त मूर्तीची पूजा, महाआरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम होऊन दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेनिमित्त परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी दिवसभर गर्दी केली होती. या यात्रेच्या यशस्वीतेसाठी सुनील राऊत, बाळू राऊत, किरण राऊत, अक्षय राऊत, सोनू राऊत आदींनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *