March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.4) :-  असे म्हणतात की, बिहारमध्ये खूप क्राईम आहे. त्यामुळे बिहार म्हटले की, गुंडागर्दी, मवाली, लूटमार, खून, दरोडे आणि बरेच काही. त्यामुळे बिहार राज्याकडे गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून पाहिल्या जाते. मात्र महाराष्ट्रातील औरंगाबादची ही वाटचाल आता बिहारच्या दिशेने होत असल्याचे दिसून येते. त्याचे कारण म्हणजे येथे वाढणारी नित्यनेमाची गुंडागर्दी.


आपल्याकडे एक प्रचलित म्हण आहे, आणि ती म्हणजे ढवळ्याशेजारी बांधला पवळा. या म्हणीचा अर्थ असा आहे की, एखाद्या चांगल्या माणसाबरोबर वाईट माणूस बसला तर त्याला वाईटची संगत लागते. आणि जर एखाद्या चांगल्या माणसाबरोबर चांगला माणूस बसला तर त्याला चांगलीच संगत लागते. औरंगाबाद, बजाजनगर ही कामगार वसाहत मिनी भारत म्हणून ओळखल्या जाते. औद्योगिक वसाहतीमुळे येथे भारताच्या प्रत्येक राज्यातील कामगार स्थायिक झालेला आहे. त्यात अनेक वाईट लोकांचा समावेश आहे. आणि त्यामुळेच बजाजनगर, औरंगाबाद येथील नागरिकांना तशी संगत लागत आहे.
चोऱ्या माऱ्या नित्याच्याच

बजाजनगर ही कामगार वसाहत असल्याने आणि पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याने या परिसरात मारामाऱ्या, लूट मार, खून, दरोडे आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी आणि छेडखानी असे प्रकार नित्यनेमाचेच झाले आहे. त्यातूनच बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यात महिलांचा समावेश अधिक आहे.
वेळीच अंकुश ठेवावा
वाळूज औद्योगिक वसाहतीतील दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंदे. त्यामुळेही या परिसरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. यावर वेळीच अंकुश ठेवण्याचे काम पोलीस प्रशासनाचे आहे. मात्र हा अंकुश म्हणावा तसा ठेवला जात नाही. अर्थात त्याला तोडकी पोलीस यंत्रणाही कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये फ्रीस्टाइल

गेल्या दोन दिवसांपूर्वी बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात विद्यार्थ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. त्यात एका विद्यार्थ्याला अक्षरशः दगड, विटांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्याचे पुढे काय झाले माहित नाही. मात्र याबाबत कुठेच वाचता झाली नाही. परंतु परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेरा त्याचे चित्र झालेले आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने बजाजनगर, औरंगाबाद येथे मोठी खळबळ उडाली आहे.
शिक्षण की, गुंडागर्दी
बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौक हे शैक्षणिक हब म्हणून ओळखल्या जाते. येथे विविध नामांकित समजल्या जाणाऱ्या कोचिंग क्लासेस आहे. त्यामुळे येथे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांची गर्दी असते. मात्र हे विद्यार्थी या परिसरात शिक्षण घेण्यासाठी येतात की, गुंडागर्दी करण्यासाठी हेच समजत नाही. विशेष म्हणजे पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
ओळख आशिया खंडात
सर्वात जास्त प्रगती करणारे अल्पावधीतील शहर औरंगाबाद म्हणून गणल्या जाते. औरंगाबादची ओळख संपूर्ण आशिया खंडात याच नावाने आहे. मात्र याच औरंगाबादची ओळख आता गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे येथे बिहार सारखी परिस्थिती होण्यास वेळ लागणार नाही. हे सुद्धा तेवढेच सत्य आहे.

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *