
वाळूजमहानगर, (ता.01) – सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी एकत्र येत सुबक साखळी करत नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात व जल्लोषात करण्यात आले.

यावेळी शाळेच्या संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा म्हस्के, श्रद्धा म्हस्के उपस्थिती होती. नववर्षाच्या स्वागतासाठी शाळेतील सर्व विद्यार्थीनीं मानवी साखळीतील वेल कम 2023 सुबक रित्या साकारले. यावेळी सोनाली कुलकर्णी, रुपाली उपलकर, मधूश्री डाके, रुपाली चौधरी, वंदना कदम, सुवर्णा जोशी, वीणा कन्नवार, सुवर्णा कदम, सरिता डावखर, मोनिका चतुर्भुज, अर्चना जगताप, मयुरी पवार, सरला रोडगे, राणी कांबळे, कुणाल शिंदे, सई राणे यांनी परिश्रम घेतले.
