वाळुज महानगर, (ता.27) – वाळुज औद्योगिक वसाहतीतील वडगांव (को.) गट नंबर 11 येथील साई कॉम्प्युटर इन्स्टियुट व साई सुपर अबॅकस तसेच जयश्री एस.कदम यांच्या तर्फे विद्यार्थी सत्कार व हळदी कुंकूवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या हळदी कुंकू कार्यक्रमात इंगोलताई संगमित्र यांचे अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. तसेच अध्यक्ष म्हणून भाग्यश्री जाधव, पालक प्रतिनिधी म्हणून सुनिता महाजन, सुरोवसेताई यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. यावेळी विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर क्लासचे प्रमाणपत्र देऊन तसेच अबॅकस च्या 1st level चे प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. तसेच हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलासाठी विविध प्रकारच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांनी मनोरंजन गीत, नृत्या, सादर केले.
याप्रसंगी अबॅकसच्या विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी आपले मनोगत भाषणातून व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्र संचालन पुजा गोटे, पुजा जाधव, नियोजन पुजा क्षिरसागर, कोमल राऊत, सोनम सोनार, आश्विनी बारबईले, दिव्या अंधाळे, अवंतिका गिते तर कार्यक्रमाचे निरोप सभारंभ संस्कृती गोसावी यांनी केले.
