February 5, 2026

 

वाळूजमहानगर, – पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कीर्तन मंडपात रमा एकादशी निमित्त शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत भव्य किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

एकादशीच्या पावन पर्वावर येथे ह भ प रामेश्वर महाराज कोल्हे, आळंदी देवाची यांचे हरि किर्तन होणार असून पंढरपूर येथील दत्ता घोरपडे, शांताराम गिरे, ग्रा पं सदस्या मीराबाई गिरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस महाभिषेक, संतपूजन व साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे. या किर्तन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *