March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.28) – हेवेदावे आणि राजकारणावर जास्त लक्ष न देता नागरीकांच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी विकास कामांवर भर द्या. असा सल्ला माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शनिवारी (ता.27) रोजी सदिच्छा भेटी दरम्यान दिला. 

 

सुमारे पाच महिने रंगलेल्या जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतच्या महानाट्यावर पडदा पडल्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी संभाजीनगर जिल्ह्याचे माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची शनिवारी (ता.27) रोजी सदिच्छा भेट घेतली. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत जनतेचा विश्वास जिंका, राजकारण न करता विकास कामांवर भर द्या. असा सल्ला माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख मनोज पिंपळे, जोगेश्वरीच्या नवनिर्वाचित सरपंच योगिता रामेश्वर आरगडे, उद्योजक अमोलभाऊ लोहकरे, युवासेना उपतालुका अधिकारी रमेशभाऊ आरगडे, माजी सरपंच गजानन बोंबले, माजी उपसरपंच प्रवीण दुबिले, प्रभाकर काजळे, अनिल वाघ, प्रवीण थोरात, मीना पंडित पनाड, भारती गणेश साबळे, शांताबाई मन्साराम बिलवाल, सोनू अमोल लोहकरे, रुक्मिणी कृष्णा काजळे, संगीता गणेश ठोकळ यांच्यासह अमोल धनवटे, विक्की वाहुळ यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *