February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.3) :- ह्युमाना पिपल टू पिपल इंडिया ही संस्था व आरोग्य विभागाद्वारे प्राथमिक आरोग्य, केंद्र जिकठाण यांच्या संयुक्त विद्यमाने वाळूज येथे शालेय विद्यार्थ्यांची व अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस व आशा वर्कर्स यांच्या उपस्थितीत रॅली काढून गुरुवारी (ता.1) रोजी एड्स विषयी जनजागृती करण्यात आली.

यावेळी विश्व एड्स दिवस व राष्ट्रीय आशा दिवस उत्साह साजरा करण्यात आला. ह्युमाना पिपल टू पिपल संस्थेद्वारे ‘सुरक्षित मातृत्व एवं बाल स्वास्थ परियोजना अंतर्गत या कार्यक्षेत्रात विविध कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच हा एक भाग होता. कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. रोकडे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. यावेळी एचपीपीआयच्या वतीने प्रकल्प अधिकारी शंकर गुर्जर, भार्गव देशपाडे, सुनिता मोरे, सरिता सोनवणे उपस्थित होते. तसेच आशा, गटप्रवर्तक व अंगणवाडी कार्यकर्त्या याही उपस्थित होत्या. व्यावर्षी जागतिक एड्स दिवसाची संकल्पना ही “समानता “असल्यामुळे सर्वांनी याबद्दल मार्गदर्शन केले. वेळी काढण्यात आलेल्या भव्य रॅली व विविध कार्यक्रमाद्वारे परिसरातील सर्व नागरिकांना ‘एइस’ बद्दल माहिती दिली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *