February 23, 2025

 

वाळूजमहानगर – वाळुज येथील हनुमंत गावाजवळ असलेल्या वाल्मीक ऋषी टेकडीवर प्रथमच महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती रविवारी (ता.9) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी टेकडी परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येऊन महर्षींचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी व भावी पिढीला प्रेरणा मिळावी. यासाठी टेकडीचा विकास करण्याचा संकल्प करण्यात आला.

 

प्रथम कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बी पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड.अनिलकुमार बस्ते यांच्या हस्ते वाल्मीक ऋषी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 

महर्षी वाल्मीक ऋषींचा खरा इतिहास जाणून घेणे काळाची गरज आहे. कारण मनुवादी लोकांनी महर्षी वाल्मिकी ऋषींचा खोटा इतिहास सांगून मूळनिवासी (आदिवासी) यांना वनवासी बनवले आहे. असे अनिलकुमार बस्ते म्हणाले.

या प्रसंगी बजाजनगर येथील सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ कोळी अण्णा, कोळी समाजाचे नेतृत्व करणारे प्रा.भागवत जमादार, भारतीय कामगार सेनेचे शिवाजी तुरटवाड, माधवराव बुधवारे, अविनाश गायकवाड, अशोक श्रीखंडे यांनी महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या विचारावर मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाला बी पँथरचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अँड. विकास बनकर, तालुकाध्यक्ष अमोल वाघमारे, अँड. भिसे, दिपक मोकळे, अविनाश गायकवाड, वाळुज महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष आर के भराड, ज्ञानेश्वर शेजुळ, संजय गायकवाड, संतोष तलवारे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष कल्पनाताई सोळंके, आशाताई पवार, पंचायत समिती सभापती ज्योती गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान माळी यांनी तर आभार माधवराव बुधवारे यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *