
वाळूजमहानगर, (ता.24) – वाळूज येथे बाळासाहेबांची शिवसेना गंगापूर या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक होऊन वाळूज शहर नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. बाळासाहेबांची शिवसेना गंगापूर तालुका अध्यक्ष दिलीप निरपळ यांच्या अध्यक्षतेखाली वाळूज येथील कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.
या कार्यकारीणीत वाळुज विभाग प्रमुख राजन तावरे पाटील, युवासेना वाळूज शहर प्रमुख शुभम पाटील हुले, वाळूज शहर उपप्रमुख अमोल ठोकले, वाळूज शहर व प्रमुख गोवर्धन राजपूत, युवा सेना वाळूज शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार, युवा सेना वाळूज शहर उपप्रमुख गौरव राऊत, आदी पदाधिकाऱ्यांची निवड वाळूज शहरासाठी करण्यात आली.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा उपप्रमुख अरुण रोडगे, दिलीपसिंग राजपूत यांनी नियुक्त केलेल्या सर्व पदाधिकाऱ्याचे स्वागत केले. यावेळी गंगापूर शिवसेना उपतालुकाप्रमुख नंदकुमार राऊत, वाळूज ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे, राहुल भालेराव, बालाजी सुकाळकर यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
