
वाळुज महानगर, (ता.19)- मदर तेरेसा इंग्लिश स्कूल व महाराष्ट्र मराठी प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा वाळूज येथे संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष नबी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली “अल्पसंख्यांक हक्क दिवस” सोमवारी (ता.18) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तथा सहारा एज्युकेशन व वैद्यकीय सेवा मंडळ औरंगाबादचे प्रशासकीय अधिकारी अफसर पटेल
व प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य तोफिक पटेल यांची उपस्थिती होती. प्रथम अध्यक्षांनी “मौलाना अबुल कलाम आझाद”यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना “अल्पसंख्यांक” नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव याविषयी माहिती दिली. 
यामध्ये विद्यार्थ्यांनी “अल्पसंख्यांक हक्क दिवस” याविषयी पोस्टर तयार केले. यावेळीं शाळेतील विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इरफान शेख, अय्युब सय्यद, रफिक शेख, योगेश मोर्ये, रघुनाथ अंभोरे, अरविंद गोरे, संतोष खरात, रवींद्र फरकाडे, काकळे स्वप्नील, शेख ताजुद्दीन आदींनी परिश्रम घेतले.
