वाळूजमहानगर, (ता.5) – तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त वाळुज महानगरात शुक्रवारी (ता.5) रोजी सकाळी धम्म रॅली (मिरवणूक) काढण्यात येऊन जगाला युद्ध नको बुद्ध हवा.असा शांतीचा संदेश या धम्म रॅली मिरवणुकीतून देण्यात आला.
जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2567 जयंतीनिमित्त वाळुज महानगरात पद्मपाणी बुद्ध विहाराच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा, तथागतांचे विचार आणि शिकवणच जगात शांती नांदवू शकते.
असा संदेश देत वाळुजमहानगरात शुक्रवारी (ता.5) रोजी सकाळी धम्म रॅली (मिरवणूक) काढण्यात आली. या धम्म रॅली मिरवणुकीत वाळूज परिसरात तील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
