वाळूजमहानगर – वाळूज औद्योगिक परिसरातील बजाजनगर व रांजणगाव (शेणपुंजी) येथून 2 लाख 25 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
शहारुख गुलाम मोहम्मद शेख रा.रांजणगाव यने सचिन शेवते रा.येवला आखाता ता.राहुरी येथील मित्राची 1 लाख 35 हजार रुपये किमंतीची बुलेट (एम एच 17, सी डी -3717) कंपनीत ये-जा करणार्यासाठी आणली होती. ती घरासमोर उभी केलेली असताना अज्ञात चोरट्याने 21 आगस्ट रोजी लंपास केली.
दुसर्या घटनेत बजाजनगर येथील कपील अशोक शेळके याने एक महिन्यापुर्वी चेतन उत्तम लोखरे यांच्याकडून 90 हजारा दुचाकी (एम एच 12, एन वाय -0608) खरेदी केली. मात्र काही पैसे बाकी असल्याने कपील शेळके यांनी ती दुचाकी स्वत:च्या नावावर केली नव्हती. दरम्यान, रविवारी 28 आगस्ट रोजी कपील शेळके याच्या घरासमोरुन चोरुन नेली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
