February 5, 2026


वाळूज महानगर – नॉयलॉन मांजा विक्री व वापरण्यास बंदी असतांना सुध्दा तो खुलेआम जवळ बाळगुन, विक्री करणाऱ्यावर तसेच खरेदीदारावर शहर गुन्हे शाखाच्या पथकाने छापा मारून विविध ठिकाणाहून वेगवेळ्या कंपनीचा 2 लाख 70 हजार रुपये किमतीच्या नॉयलॉन मांजाचे 300 रिळ जप्त केले. ही कारवाई सोमवारी 15 डिसेंबर रोजी रात्री छत्रपती संभाजीनगर शहरासह वाळूज महानगरात करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाळुज महानगरात गांजाची चोरटी विक्री होत आहे अशी माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहरासह वाळूज महानगरात विविध ठिकाणी छापा मारला. यात प्रथम रांजणगाव (शेणपुंजी) ते कमळापूर रोडवरील पुष्पनगरी येथील एका दुकानाच्या तळघरात छापा मारला. तेथे रुदाक्ष संतोष बुरसे याच्या ताब्यात 54 हजार 900 रुपये किमतीच्या 61 रिळ मिळून आल्या. त्यानंतर रुदाक्ष संतोष बुरसे यास अधिक विचारपुस केली असता त्याने भागवत जाधव यास नॉयलॉन मांजाचे तीन बॉक्स राज जगताप यास एक बॉक्स विक्री केल्याचे सांगितले. पोलीसांनी भागवत यांच्या स्वामी संमर्थ किराणा दुकानात छापा मारला असता त्याच्याकडे 1 लाख 29 हजार 600 रुपये किमतीचे 144 रिळ मिळून आल्या. त्यानंतर रोहन ढेंगळे व सुदिप डोईफोडे यांच्या ताब्यातून 64 हजार 800 रुपये किमतीचे 72 रिळ मिळून आले. व राज जगताप याच्या ताब्यातून 20 हजार 700 रुपये किमतीचे 23 रिळ मिळून 2 लाख 70 हजार रुपये किमतीच्या 300 रिळ जप्त करण्यात आल्या. ही कारवाई शहर गुन्हेचे निरिक्षक गजानन कल्यानकर यांच्या मार्गदशनाखाली शाखचे उपनिरिक्षक प्रविण वाघ, पोलीस हवालदार योगेश नवसारे, विजय निकम, पोलीस अंमलदार राजेश यदमळ, अक्षय नाटकर, शाहरूख शेख, दिनकर आवरे, महिला पोलीस अंमलदार संजवनी शिंदे, सोमनाथ दुकले आदीच्या पथकाने केली. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राहुल बंगाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी रुद्राक्ष संतोष बुरसे रा. ईद्रप्रस्त कॉलनी बजाजनगर, भागवत अंबादास जाधव रा. जयभवानीनगर, म्हाडा कॉलनी, रोहन राजेंद्र ढेंगळे रा. बजाजनगर, सुदिप राजु डोईफोडे रा. गट नंबर व राज विनोद जगताप रा. टिंबर गल्ली बेगमपुरा यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. प्रविण पाथरकर करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *