March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.21) – लाखाच्या घरात लोकसंख्या असलेल्या सिडको वाळूज महानगर प्रकल्पातील तिन्ही नगरात अत्यल्प व अवेळी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथे पाण्याचा ठणठणाट असून पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी कृती समितीच्या माध्यमातून सिडको कार्यालयात धाव घेत गुरुवारी (ता.20) रोजी सिडको प्रशासनाला निवेदन दिले.


वाळुज परिसरात सिडकोने वाळूज महानगर -1, महानगर -2 व महानगर -4 अशी नगरे निर्माण केली. त्यास मोठा प्रतिसाद मिळाल्याने येथील नगर – 1, 2 आणि 3 मध्ये जवळपास 1 लाखापेक्षा जास्त नागरिक राहतात. या प्रकल्पाची सुरूवात होऊन जवळपास 3 दशक झाली. येथील नागरिकांसाठी औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजुर 5 ते 7 एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र गेल्या 15 दिवसांपासून वाळूजमहानगर अंतर्गत पाणी पुरवठा अत्यल्प तसेच अवेळी होत आहे. वास्तविक पाहता प्रकल्प अंतर्गत 1 लाखापेक्षा जास्त नागरिक राहतात. लोकसंख्येच्या तुलनेत येथे दररोज 12 ते 14 एलएमडी पाण्याची अवश्यकता आहे. लोकसंख्येच्या तुलनेत अवश्यक पाणी मिळावे. यासाठी यापूर्वी सुध्दा सिडको कार्यालयात लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र अवश्यक पाणी प्रकल्प अंतर्गत मिळत नाही. वाढीव पाण्याची मागणी सिडकोकडून औद्योगिक विकास महामंडळाकडे केली होती. त्या अनुषंगाने आवश्यक रक्कम भरणा करण्यात आला नाही. यामुळे औ.वि.म. मंडळाकडून वाढीव पाणी पुरवठा मंजुर करण्यात आला नाही. आज जो पाणी पुरवठा मंजुर आहे, तोसुध्दा मिळत नाही. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी सिडको वाळूजमहानगर बचाव समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको कार्यालयात धाव घेत गुरुवारी (ता.20) रोजी सिडको प्रशासनाला निवेदन दिले.

यावेळी कृती समितीचे उपाध्यक्ष नरेंद्र यादव, शितल गंगवाल, आदिक पाटील, तेजस बढे, विशाल अंतमवाड, नारायण साळुंके, कृष्णा खर्च, माणिक कुलकर्णी, गणेश निर्वाण, एम एस दारकुडे, राम राऊत, स्वप्नील राजगुरु, सचिन महाजन, कृष्णा चोबे, ज्ञानेश्वर गुद्दे, संदिप लांगडे, भुजंग कुंजखड, सुभाष लहाने, प्रविण गोसावी. आदी उपस्थित होते.
कार्यालयातच मांडला ठिया –
सिडको वाळूज महानगर येथे पाण्याचा ठणठणाट असल्यामुळे येथील नागरिक कृती समितीच्या
माध्यमातून सिडकोचे मुख्य प्रशासक भाग्यश्री विसपुते यांना निवेदन देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयात गेले. मात्र त्या तेथे उपस्थित नव्हत्या. म्हणून नागरिकांनी त्यांच्या कार्यालयातच खाली मांडी घालून बसत ठिय्या मांडला. हा प्रकार लक्षात येताच सिडको प्रशासक भागवत बिघोत, कार्यकारी अभियंता कपिल राजपूत आदींनी धाव घेत निवेदन स्वीकारले.
अन्यथा न्यायालयात जाऊ, आंदोलन करू –
सिडको प्रशासनाने वाळूज महानगरातील पाणीटंचाईवर तात्काळ उपाय योजना करावी. आवश्यकता असल्यास टँकरने पाणीपुरवठा करावा. मात्र उपाय योजना न केल्यास न्यायालयात जाऊ, दाद मागू किंवा लोकशाही मार्गाने आंदोलन करू. असा इशारा सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांनी दिला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *