March 25, 2026

वाळूजमहानगर, ता.20 – मतदान यंत्रात बिघाड, बोगस मतदान, सौम्य लाठीचार्ज व मतदानावर टाकलेल्या बहिष्कार अश्या घटना वगळता वाळूजमहानगरातील पश्चिम व गंगापूर – खुलताबाद मतदार संघातील 133 मतदान केंद्रावर बुधवारी (ता.20) शांतेत मतदान झाले. मात्र अत्यंत धिम्यागतीने सुरू असलेल्या या मतदानास दुुुपारनंतर गती मिळाली. परिणामी अनेक मतदान केंद्रावर लांबचलाब रांगा लागल्या होत्या. रांजणगाव शेंपुंजी येथे गर्दीचा उच्चांक झाल्याने सायकांळी 6 नंतर मतदान प्रक्रिया सुरू होती. दरम्यान अनेक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातील विविध मतदान केंद्राला भेटी देत माहिती जाणुन घेतली.

विधानसभेच्या संभाजीनगर पश्चिम व गंगापूर- खुलताबाद विधानसभा मतदार संघात वाळूज महानगर विभागलेले आहे. वाळुज एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रातील पश्चिम मतदार संघाचे बजाजनगर, वडगाव, तीसगाव, सिडको वाळूजमहानगर, पंढरपूर, वळदगाव, पाटोदा, साजापूर असे 66. तर गंगापूर -खुलताबाद मतदार संघातील रांजणगाव, कमळापूर, जोगेश्वरी, घाणेगाव, विटावा, घेतला नांदेड आदी भागात 67 मतदान केंद्र आहेत. बुधवारी (ता.20) रोजी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेस सकाळी अत्यंत घेण्या गतीने सुरुवात झाली. त्यामुळे केंद्रावर तूरळक मतदार दिसत होते. दरम्यान, दुपारनंतर मतदार राजा घराबाहेर पडल्याने मतदान केंद्रावर गर्दी पहावयास मिळाली.
दरम्यान वाळूजमहानगर परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी म्हणून एमआयडीसी वाळूज ठाच्याचे निरिक्षक कृष्णा शिंदे यांनी चोख बंदोबस्थ ठेवला.

रांजणगाव येथे उच्चांक गर्दी –
वाळुज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील जिल्हा परिषद नवीन शाळा मतदान केंद्रावर मतदारांची उच्चांक गर्दी दिसून आली. परिणामी या मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे या मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे रांजणगाव (शेणपुंजी) या परिसराला मिनी भारत असे संबोधल्या जाते. कारण येथे भारतातील प्रत्येक राज्यातील नागरिक काम धंद्या निमित्त स्थायिक झाला आहे.

मतदान यंत्र पडले बंद –
रांजणगाव (शेंपु) येथील नवीन जिल्हा परिषद शाळेत बुथ नं 202 मध्ये मतदान यंत्र बंद पडले होते त्यामुळे सुमारे एक तास मतदान प्रक्रियेत व्यक्त असल्याने गोंधळ उडाला होता. मतदारांना रांगेमध्ये उभा राहावं लागलं होते. परंतु नंतर नवीन मशीन बसविल्यावर मतदान सुरुळीत झाले.

अनेकांना नाही मिळाली पोलचीट –
बजाजनगर, रांजणगाव, वडगाव, पंढरपूर, जोगेश्वरी, वाळूज या दाट कामगार वसाहत असलेल्या ठिकाणी अनेक मतदारांना पोलचीट न मिळाल्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांना नाव शोधत ताठकळत उभे रहावे लागले. या भागातील बीएलओने कागदोपत्रीच पोलचीट वाटप केल्याचा आरोप अनेक मतदारांनी केला. शेवटी मतदान केंद्रासमोरील कार्यकर्त्यांनी नाव शोधून दिल्याने मतदारांनी त्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *