March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.25) – आत्याच्या घरी गेलेल्या वाळूज येथील एका 35 वर्षीय महिलेला आत्याच्या नवऱ्याने मारहाण करत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर जीव मारण्याची धमकी दिली. पाचवामैल ता. तासगाव जि. सांगली येथे 17 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान घडलेल्या या घटनेप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज येथील पिडित महिला तिच्या आत्याच्या घरी पाचवामैल येथे गेली होती. ती आत्याच्या घरी पाचवामैल ता. तासगाव जि. सांगली येथे झोपलेली असतांना आरोपी तिच्या आत्याचा नवरा राजु रितेश काळे याने लोखंडी रोडने तिला मारहाण करुन तिच्या सोबत जबरी संभोग केला. व कोणाला सांगीतले तर जीवे मारण्याची धमकी दिली. 17 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान घडलेल्या या घटनेनंतर पीडित महिला वाळूज येथे आली. आणि फिर्याद दिल्याने वाळूज पोलिस ठाण्यात आरोपी राजु रितेश काळे याच्या विरुद्ध कलम 376(2), (एन) 376, (2)(एफ), 324, 506 भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हयातील घटनास्थळ हे पाचवा मैल ता. तासगाव जि. सांगली येथे असल्याने वाळूज पोलिसांनी तासगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा वर्ग केला आला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *